ठाणे : ‘ती’ 5व्या मजल्यावरून उडी मारण्याच्या तयारीत होती, इतक्यात…

12
girl-attempt-suicide

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाण्यातील पोलीस शाळेजवळील इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा एका तरुणीने प्रयत्न केला. मात्र पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटना स्थळी वेळेवर पोहोचल्याने पुढचा अनर्थ टळला.

ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस शाळेजवळ भास्कर अपार्टमेंट ही 13 मजल्याची इमारत आहे. या इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून या तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिने स्वतः च्या हातावर आणि पोटावर ब्लेडने वार केले आहे. ही तरुणी कोण आहे आणि या ठिकाणी काशी पोहोचली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.