परमबीर यांची ठाणे पोलिसांत सात तास चौकशी, ठाणेनगर पोलीस ठाण्यात हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयाने फरार घोषित केलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे शुक्रवारी ठाणे पोलिसांसमोर हजर झाले. ठाणेनगर पोलीस ठाण्यात उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी त्यांची तब्बल सात तास कसून चौकशी करत जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर परमबीर यांनी ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱयांसमोर हजेरी लावली.

व्यावसायिक सोनू जालान, रियाज भाटी, केतन तन्ना यांनी परमबीर सिंह यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीनंतर ठाणेनगर पोलीस ठाण्याने खंडणीचा गुन्हा दाखल करीत परमबीर यांच्यासह 28 जणांना आरोपी केले होते. त्यात वारंवार समन्स बजावूनही परमबीर सिंह हजर झाले नव्हते. गुन्हा दाखल झाल्यापासून सिंह बेपत्ता होते. त्यामुळे सिंह यांना वारंवार निर्देश देऊन देखील ते चौकशीस हजर राहात नसल्याने अखेर ठाणे न्यायालयाने त्यांच्या विरोधात विनाजामीन अटक वॉरंट जारी केले होते. त्यानंतर आज अचानक सिंह सकाळी ठाणेनगर पोलिसांसमोर हजर झाले. यावेळी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी त्यांची चौकशी करीत जबाब नोंदवून घेतला.

तपास अधिकारी बोलावतील तेव्हा हजर व्हा,  ठाणे न्यायालयाने बजावले

आपल्या विरोधात जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट रद्द करावे, यासाठी परमबीर यांनी त्यांचे वकील अॅड. राजेंद्र मोकाशी यांच्यामार्फत ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केला. अॅड. मोकाशी यांनी परमबीर यांचे अटक वॉरंट रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली. मुख्य न्यायदंडाधिकारी राजेंद्र तांबे यांच्यासमोर या अर्जाची सुनावणी झाली. यावर निकाल देताना मुख्य न्यायदंडाधिकारी तांबे यांनी परमबीर यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. तुम्हाला गुह्यात सहकार्य करावेच लागेल. तपास अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीसाठी हजर रहा, असे तांबे यांनी परमबीर यांना बजावले. परमबीर यांना जामीन मंजूर करताना त्यांचे आधारकार्डही तपासून घ्या, असे निर्देशही तपास यंत्रणांना न्यायालयाने