ब्रिजल फूडची सामाजिक बांधिलकी

फूड अँड ब्रेव्हरेज ही कंपनी मिनरल वॉटर व्यवसायात आहे. दरवर्षी कंपनीला होणाऱ्या फायद्यातील 59 टक्के हिस्सा समाजसेवेसाठी खर्च केला जाणार आहे, अशी घोषणा ब्रिजल फूड ब्रेव्हरेजचे शेअरहोल्डर मुकेश कुमार जैन यांनी केली. महाराष्ट्रातील गरीब जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी मोफत औषधे आणि आरोग्य तपासणीसाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. ठाणे जिह्यातील वाडा येथील आदिवासी पाड्यातून रक्त तपासणी लॅबोरेटरी उभारून याची सुरुवात केली जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर अशाच प्रकारे गरीब जनतेसाठी रक्त व वैद्यकीय तपासणी लॅबोरेटरी उभारण्याचा त्यांचा मानस आहे.

आपली प्रतिक्रिया द्या