शिक्षिकेचा पराक्रम, 11 वर्षाच्या मुलीला घरकामाला ठेवले; मुलाला सांभाळलं नाही म्हणून बेदम मारहाण

11 वर्षाच्या मुलीकडून घरकाम करून घेतल्याप्रकरणी तसेच तिला मारहाण केल्याप्रकरणी तिला ठाण्यातील एका शिक्षिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुजा आशिष यादव असे त्या आरोपी शिक्षिकेचे नाव असून तिने एका प्लास्टिकच्या पाईपने सदर मुलीला मारहाण केली आहे.