Thane crime news – ठाण्यात तलवारीने तरुणाची हत्या

ठाण्यात भररस्त्यात कारमधून बाहेर खेचत तलवारीने वार करून एका तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना कासारवडवली येथील आनंद नगर येथे रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. सतीश पाटील असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले असून या हत्येने कासारवडवली परिसर हादरून गेला आहे. या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रात्री उशिरापर्यंत पोलिस पंचनाम्याचे काम सुरू होते.

मृत सतीश पाटीलचा इस्टेट ब्रोकरचा व्यवसाय आहे. तो कासारवडवली येथील आनंद नगर नाका येथे कारने आला असता हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवारीने वार केले. या हल्ल्यानंतर सतीश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला. ही हत्या पूर्ववैमानस्यातून अथवा आर्थिक व्यवहारातून झाल्याचा कायास पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला आहे.