ऐरोली-कळवा एलिवेटेड लिंक प्रकल्प अतिक्रमणात गुरफटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
elevated link

नवी मुंबईच्या ट्रान्सहार्बर लाइनला मध्य रेल्वेच्या मेन लाइनशी कनेक्ट करणाऱ्या ऐरोली-कळवा लिंक प्रकल्प अतिक्रमण आणि पुनर्वसनच्या चक्रात अडकला आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मुंबई शहर वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी-3) अंतर्गत या प्रकल्पाचे काम सुरू केले असून या प्रकल्पास तीन वर्षांपूर्वी रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. ऐरोली ते कळवा एलिवेटेड लिंक प्रकल्पासाठी जेथे आम्हाला जमीन उपलब्ध आहे तेथे बांधकाम करण्यात येत असून दिघा येथे नवे स्थानकही बांधण्यात येत आहे. या मार्गात सुमारे 1067 प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे. त्यातील 924 प्रकल्पबाधितांना घरे मिळविण्यासाठी एमएमआरडीएने यादी निश्चित केली होती. परंतु कोविडच्या लॉकडाऊनमुळे तसेच स्थानिकांनी विरोध केल्याने ही प्रकल्पबाधितांची माहिती जमा करण्याची प्रक्रिया रखडली आहे. या एलिवेटेड प्रकल्पामुळे कल्याणच्या प्रवाशांना ठाण्यात न उतरता वाशी-बेलापूरला जाण्यासाठी थेट पर्याय मिळणार आहे. त्यामुळे ठाणे स्थानकाचा प्रवासीभार कमी होणार आहे.