स्व. भगवानदासजी गुप्त स्मृती चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न

731

दि चिखली अर्बन विद्यानिकेतन चिखली येथे ४ व ५ ऑक्टोबर रोजी स्व. भगवानदासजी गुप्त स्मृती चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळा आज शनिवार ५ रोजी पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाऊसाहेब शेळके यांनी भुषविले. प्रमुख अतिथी म्हणून रविंद्र भुसारी, सुबोध गुप्ता, अशोकराव देशमुख, महावीर थानवी, गोपाल शर्मा, माधव मंडळकर, चिखली अर्बन विद्यानिकेतच्या पालक संचालिका जोत्स्ना गुप्त, प्राचार्य जीवन सपकाळे, शैक्षणिक संचालिका पुजा गुप्ता, तालुका क्रीडा संयोजक प्रभाकर जाधव, अमोल उरसाल, सारिका देशमुख हे उपस्थित होते.

या स्पर्धेच्या अंडर १७ वयोगटातील मुलांच्या गटातून म. वा. पातुरकर विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक के.बी.जे. नॉलेज हब बोराखेडी तसेच तृतीय क्रमांक जे.बी.के. विद्यालय टेंभुर्णी यांनी पटकावला. अंडर १७ वयोगटाच्या मुलींच्या गटातून लि. भो. चांडक विद्यालय मलकापूर यांनी प्रथम (७००० रुपये), राजमाता जिजाऊ मुलींची सैनिकी शाळा चांधई द्वितीय (५००० रुपये) तसेच जिजामाता हायस्कूल दुधा यांनी तृतीय (३००० रुपये) क्रमांक पटकावला.

या स्पर्धेच्या अंडर १४ वयोगटातील मुलांच्या गटातून ५००० रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस सरस्वती विद्यालय जानेफळ, द्वितीय क्रमांक (३००० रुपये) जि.प. विद्यालय भानखेड व तृतीय (२००० रुपये) रेणुकामाता विद्यालय भालगाव यांनी पटकावला. याच गटातील मुलींमधून प्रथम क्रमांक (५००० रुपये) राधाबाई खेडेकर विद्यालय चिखली, द्वितीय (३००० रुपये) राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लीश स्कूल चिखली तसेच तृतीय क्रमांक (२०० रुपये) चैतन्य गुरुकूल विद्यालय खंडाळा (मकरध्वज) च्या मुलींनी पटकाविला. यावेळी प्रमुख अतिथी रविंद्र भुसारी यांनी विजयी संघाचे कौतुक केले. ज्या संघांना जिंकता आले नाही त्यांनी पुढील वर्षी पुर्ण जोमाने असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रतिक बावस्कर यांनी तसेच आभार प्राचार्य जीवन सपकाळे यांनी मानले.

आपली प्रतिक्रिया द्या