नगरमध्ये ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तारीख पुन्हा पुढे ढकलली, राजकारणाची चर्चा

nagar

नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या दिमाखामध्ये होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा पुढे ढकलल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलेल्या तयारीवर पुन्हा एकदा पाणी फिरले असेच म्हणण्याची वेळ आली आहे. या कार्यक्रमाला तारीख पे तारीख असेच म्हणण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.

राज्यभरामध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यक्रम राबवला जात आहे. कोट्यावधी रुपयांचा खर्च या कार्यक्रमासाठी केला जात आहे. आज काही जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम पार पडलेले आहेत. नगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यापासून या कार्यक्रमाला मुहूर्त लागायला तयार नाही, आत्तापर्यंत सहा वेळेला हा कार्यक्रम होणार असे जाहीर झाले मात्र प्रत्यक्षात तो कार्यक्रम झालाच नाही.

त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दोन दिवसापूर्वी याच अनुषंगाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नगरमध्ये तसेच संगमनेर शिर्डी, श्रीरामपूर आदी भागांमध्ये जाऊन या कार्यक्रमात त्यासाठी नियोजन आखून सरकारी पातळीवर बैठका घेतल्या व महसूल यंत्रणा कामाला लावली एवढेच नाही जिल्ह्यातील सर्व यंत्रणा याबाबत कामाला लागल्या, अनेक अधिकारी वर्ग हे या योजनेसाठी नेमलेले आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहे.

विशेष म्हणजे शिर्डी विमानतळाच्या जवळ हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. मुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांना ते सोयीस्कर व्हावे त्यासाठी ती जागा निवडण्यात आली होती, अशी चर्चा आहे. पण या कार्यक्रमासाठी मुहूर्त काही लागायला तयार नाही.

दिनांक 11 रोजी हा कार्यक्रम घेण्यात येणार होता. मात्र आजच हा कार्यक्रम पुढे ढकलून तो दिनांक 17 ऑगस्ट रोजी ठेवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी कोट्यवधी रुपयांचा मंडप उभारणीसाठी खर्च करण्यात आलेला आहे. एक महिन्यापासून हा मंडप त्याच ठिकाणी कसा आहे? त्यामुळे याचे भाडे सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. आज कोट्यवधी रुपये यासाठी खर्च केले जात आहे. विशेष म्हणजे जे कोणी लाभार्थी आहेत त्यांना ने -आण करण्यासाठी साडेचारशे बसेस या निश्चित केलेले आहे, त्यासाठी सुद्धा कोट्यवधी रुपये हे देण्यात आलेले आहे. एकंदरीतच शासन आपल्या जागेसाठी आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला. दुसरीकडे शासकीय यंत्रणा गेल्या तीन महिन्यापासून याच कार्यक्रमाच्यासाठी प्रत्येक वेळेला बैठक मिटिंग व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा असे प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे लाभार्थ्यांना सातत्याने संपर्क करून हा कार्यक्रम प्रत्येक वेळेला सांगितलं जात आहे. यांना हा कार्यक्रम होईल असं वाटत होतं. मात्र आता पुन्हा एकदा पुढे ढकलल्यामुळे एक प्रकारे राजकीय वर्तुळामध्ये राजकारण सुरू झाले की काय अशी सुद्धा चर्चा भाजप अंतर्गत आता पाहायला मिळत आहे.