‘आयमॅक्स’चा पडदा पुन्हा उघडणार

वडाळा येथील ऐतिहासिक ‘आयमॅक्स’ थिएटर पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खुले होत आहे. प्रेक्षकांची प्रचंड पसंती असणारे हे थिएटर गेल्या वर्षभरापासून बंद होते. मात्र ‘मिराज सिनेमा’च्या माध्यमातून हे थिएटर पुन्हा सुरू होत आहे. ‘आयमॅक्स’ संस्था आणि ‘मिराज’ इंटरटेंटमेंटमध्ये थिएटरमध्ये याबाबत पार्टनरशिपचा करार करण्यात आला. हा करार देशातील दोन दिग्गज कंपन्यांमध्ये झालेला पहिला मोठा करार ठरला आहे. कार्निव्हल तोटय़ात गेल्याने हे थिएटर बंद करण्यात आले होते. मात्र आता हे थिएटर आता पुन्हा सुरू होत असल्याने प्रेक्षकांना पर्वणीच ठरणार आहे.