शिवसेनेत इनकमिंग जोरात, जोगेश्वरीमधील शिंदे गटाच्या आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षांतून शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे. जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र. 52 मधील शिंदे गटातील शेकडो महिला पदाधिकाऱ्यांनी तसेच प्रभाग क्र. 53 मधील काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.

 प्रभाग क्र. 52 मध्ये शिंदे गटातून शिवसेनेत पक्षप्रवेश करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये वनिता येळींजे (शाखा संघटक), मीना धिवरे (प्रभारी शाखा समन्वयक), विद्या रूपवते (उपशाखाप्रमुख), पुष्पा पगारे, माया बाविस्कर, वैशाली बावदनकर, स्नेहल दळवी, रंजना पवार (उपशाखाप्रमुख), अर्चना जाधव, सपना विश्वकर्मा, संगीता पवार, संगीता घोलप, ज्योती धिवरे, शोभा जाधव, वंदना बडेकर, भाग्यश्री मोरे, मनीषा रामाणे, सविता बने, माधवी महाडिक, जेसीसख्वामी, मनीषा घोलप, ज्योत्स्ना फापाळे, सरोज जेडियार, अश्विनी पवार, हर्षा भगत, मीरा विश्वकर्मा, मंगल शिंदे, मंदा काटकर, पूजा भोईर, संध्या मसुरकर, पूजा पवार, शीतल मोरे, रीमा परेरा, संध्या शृंगार, पार्वती शेलार, निर्मला पोळ, नीता सावंत, दक्षा राठोड व गीता जैसेवार यांचा समावेश आहे.

तसेच प्रभाग क्र. 53 मध्ये काँग्रेसच्या सुनील कुमरे (अध्यक्ष, मुंबई विभागीय आदिवासी काँग्रेस), कैलाश पटेल (उपाध्यक्ष, मुंबई आदिवासी काँग्रेस), संजय फरले (महासचिव, मुंबई आदिवासी काँग्रेस), प्रवीण दुबळा (अध्यक्ष, मागाठाणे तालुका आदिवासी काँग्रेस),  अंकिता मांजरेकर (वार्ड अध्यक्ष, काँग्रेस), सुनीधी पुमरे (जोगेश्वरी विधानसभा महिला काँग्रेस), रमेश सत्यमूर्ती (महासचिव, अनुसूचित जाती विभाग, मुंबई काँग्रेस), अशोक पटेल, दिनेश गरसिया, राजेश खारवी, अशोक रजपूत, किशोर पाल, संतोष रजपूत, संतोष गरसिया, रूपेश गरसिया, दर्शना राय, सोनू पाल, अनिता रजपूत, रवी खारवी, संजय पटेल यांच्यासह आरेतील अनेक आदिवासी बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी आमदार अनंत (बाळा) नर, विधानसभा प्रमुख विश्वनाथ सावंत, विधानसभा समन्वयक रवींद्र साळवी व उपविभाग प्रमुख पैलासनाथ पाठक, आशुतोष निकाळजे उपस्थित होते.