आधी लसीकरण, मग चित्रीकरण! कपिल शर्माच्या टीमने सावधगिरीने केली सुरुवात

कॉमेडियन कपिल शर्मा पुन्हा एकदा छोटय़ा पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे. नुकतीच त्याने सोशल मीडियावरून ‘द कपिल शर्मा शो’ची घोषणा केली होती. या शोचे नवीन एपिसोड शूट करण्यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण टीमने आधी लस घेऊन सावधगिरी बाळगत सुरुवात केली आहे.

‘द कपिल शर्मा शो’च्या माध्यमातून कपिल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनोरंजनसाठी सज्ज झाला आहे. ‘जुन्या चेहऱयांसोबत नवी सुरुवात’ असे म्हणत काही दिवसांपूर्वीच कपिलने काही फोटो इंस्टाग्रामवर शेयर केले होते. या सीजनमध्ये कपिलचे जुने सहकारी म्हणजेच भारती सिंह, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, चंदन प्रभाकर आणि सुदेश लहरी झळकणार आहेत. या सगळ्यांनी ‘कॉमेडी सर्कस’मध्ये एकत्र काम केले होते. ‘‘ड्रीम टीम पुन्हा भेटीला आली… लवकरच भेटूया,’’ असे या शोचा प्रोमो शेयर करत अर्चना पुरनसिंह यांनी म्हटले होते. शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी शोच्या टीमने लस घेतल्यानंतरचा सेल्फी पोस्ट केला आहे. तसेच नागरिकांनाही लस घेण्याचे आवाहन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या