‘शेरनी इज बॅक’; सुष्मिता सेनचा ट्विटरवर ‘हॉरर’ अंदाज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री सुष्मिता सेनने ट्विटरवर आपल्या ‘हॉरर स्टाइल’ची घोषणा केली आहे. तिने एक व्हिडीओ शेअर केला असून हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाची घाबरगुंडी उडेल. सुष्मिता ही माजी ‘मिस युनिव्हर्स’ आहे. हा लूक तिची सुपरहिट वेब सीरिज ‘आर्या’च्या सीझन-2 मधील आहे. तिने स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवर डिस्नी प्लस हॉटस्टारच्या लोकप्रिय वेब सीरिज ‘आर्या 2’ची घोषणा केली आहे. ही मालिका पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक असेल, असा दावा करतानाच तिने ‘फर्स्ट लूक शेरनी इज बॅक’ असेही ट्विटमध्ये लिहिले आहे.