
सामना ऑनलाईन । जयपूर
राजस्थान सरकारने मॉब लिंचिंगविरोधातील कायदा विधानसभेत पारित केला आहे. आहे. या गुन्ह्यात दोषी आढळल्यास आरोपीला जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद या नवीन कायद्यात करण्यात आली आहे.
The Rajasthan Protection from Lynching Bill 2019 has been passed in state assembly
— ANI (@ANI) August 5, 2019
गेल्या आठवड्यात संसदीय कामकाज मंत्री शांति धारीवाल यांनी मॉब लिंचिंगपासून संरक्षण हे विधेयक विधानसभेत सादर केले होते. या विधेयकानुसार हिंदुस्थानचे संविधान देशाच्या प्रत्येक नागरिकाला स्वरक्षणाचे अणि कायद्याचे संरक्षण्याचे अधिकार बहाल करते. गेल्या काही वर्षात राजस्थानसह देशभरात मॉब लिंचिंगमध्ये अनेकांचा मृत्यू ओढवला होता. जात-पात, धर्म आणि प्रतिष्ठेच्या नावाने लोकांचा जीव जाऊ नये म्हणून राजस्थानने हे विधेयक पारित केले आहे.
मॉब लिंचिंगमध्ये कोणाचाही मृत्यू झाला तर आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद या कायद्यत आहे. तसेच आरोपीला पाच लाखापर्यंत दंडात्मक कारवाई करता येणार आहे. जर मॉब लिंचिंगमध्ये पीडीत व्यक्ती जखमी झाला तर अरोपीला जास्तीत जास्त १० वर्षाची शिक्षा आणि तीन लाख रुपयांची दंडात्मकर कारवाई होऊ शकते.
























































