
सध्याच्या काळात ग्लोबल वार्ंमग म्हणजे जागतिक तापमानवाढ ही अवघ्या विश्वासमोरची फार मोठी समस्या आहे. जागतिक तापमानवाढीला अनेक घटक जबाबदार आहेत. 1990 पासून ग्लोबल वॉर्मिंगला एक टक्के श्रीमंत वर्ग जबाबदार असल्याचा अभ्यास ‘नेचर क्लायमेट चेंज’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. श्रीमंत लोकांच्या वापराचा आणि गुंतवणुकीचा जगाच्या हवामानावर कसा विपरीत परिणाम होता, यावर नव्या अभ्यासातून प्रकाश टाकण्यात आला आहे. 1990 पासून झालेल्या जागतिक तापमानवाढीपैकी एक पंचमांश तापमानवाढीला जगातील श्रीमंतांपैकी एक टक्के लोक जबाबदार आहेत, तर जागतिक तापमानवाढीच्या दोन तृतीयांश भागांसाठी दहा टक्के लोक जबाबदार आहेत, असे ‘नेचर क्लायमेंट चेंज’च्या अभ्यासात आढळून आले आहे. संशोधकांच्या मते, हवामान बदलाचा थेट संबंध उच्च उत्पन्न असलेल्या व्यक्तींच्या वैयक्तिक जीवनशैली आणि गुंतवणूक निवडींशी आहे.
तापमानातील बदल म्हणजे केवळ उत्सर्जनाशी संबंधित नसून थेट आपली जीवनशैली आणि गुंतवणूक पर्यायाशी म्हणजे संपत्तीशी संबंधित असल्याचे लेखिका सारा शोएनगार्ट यांनी सांगितले.