सीएकडील 45 लाख रुपये घेऊन नोकर पसार

सीएकडील 45 लाख रुपये घेऊन नोकरांनी पळ काढल्याची घटना गोवंडी येथे घडली. या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंद केला. दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. तक्रारदारकडे नितेशकुमार आठ महिन्यांपासून कामाला होता. त्याने चुलतभाऊ बेरोजगार असल्याने त्याला कामावर ठेवावे, अशी विनंती केली. विनंतीनुसार तक्रारदार याने राहुलकुमारलादेखील कामाला ठेवले. तक्रारदार याने त्याच्याकडे स्टॅम्प ड्युटीच्या कामाचे 45 लाख रुपये होते.