कोरोना संकटात दिलासा राज्याचा रिकव्हरी रेट 96.15 टक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सोमवारी दिवसभरात आढळलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा जवळपास दुप्पट रुग्ण कोरोनातून बरे झाल्याचे समोर आले आहे. मागील 24 तासांत राज्यभरात 15 हजार 277 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, 7 हजार 603 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 59,27,756 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 96.15 टक्के एवढे झाले आहे, तर सध्या राज्यातील मृत्युदर 2.04 टक्के एवढा आहे. सोमवारी दिवसभरात 53 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.