कन्हैयाकुमारला ग्रामस्थांनी घेरले

सामना ऑनलाईन । बेगुसराय

बिहारमधील बेगुसराय मतदारसंघातून सीपीआयच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांच्या प्रचारादरम्यान घडलेल्या एका प्रसंगाचा व्हिडीओ समोर आला आहे. बेगुसरायमधील एका गावामध्ये रोड शो करण्यासाठी गेलेल्या कन्हैयाकुमार यांचा रस्ता अडवून स्थानिक गावकऱ्यांनी कन्हैयांविरोधात घोषणाबाजी सुरू केली.  जेएनयूबद्दल या गावकऱ्यांनी कन्हैयाकुमार यांना प्रश्न विचारले. देशाविरोधात घोषणाबाजी करण्यासंदर्भात अनेक प्रश्नांचा या गावकऱ्यांनी कन्हैयाकुमार यांच्यावर माराच केला. कन्हैयाकुमार यांना ‘तुम्हाला कोणत्या गोष्टीपासून आझादी हवीय,’ असा सवाल गावातील तरुणाने करताच कन्हैया यांची बोलतीच बंद झाली.  ‘भारत तेरे तुकडे होंगे’ या घोषणाबाजीवरून अनेकांनी कन्हैयाकुमार यांना प्रश्न विचारले. गावकऱ्यांनी कन्हैयाकुमार यांच्या रोड शोचा रस्ता अडवला आणि गाडीला सर्व बाजूने घेरले. त्यानंतर त्यांनी कन्हैयाकुमार यांच्यावर प्रश्नांचा मारा सुरू केला. जेव्हा तुम्ही जेएनयूमध्ये होता तेव्हा तुम्ही कोणत्या प्रकारच्या स्वातंत्र्याची आणि आझादीची मागणी करत होता, असा सवाल गावकऱ्यांनी कन्हैयाकुमार यांना केला.