
सामना प्रतिनिधी । देवगड
पडवणे सडा, धनवडी येथील बंद शेतघराचे कुलूप तोडून 9 हजार 500 रुपये किमतीचा दीड एचपी पॉवर स्प्रे, लोखंडी फ्रेम, फूटवॉलसह 850 रुपये किंमतीची स्टीलची स्प्रे गन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार अजित गोपाळ वाडेकर (वय 60,रा.वाडा) यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे.30 जूनला सायंकाळी 7 ते 1 जुलै सकाळी 9 वाजेदरम्यान घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार एस.पी.कांबळे करीत आहेत.



























































