लातूरात घरफोडी; 1 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज पळवला

357

लातूर शहरातील उज्वल धाम परिसरातील घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोने पळवल्याची घटना घडली आहे. या चोरी प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात नरेश विजयकुमार अग्रवाल यांनी तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी हे घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सोन्याचे गंठण, सोन्याच्या अंगठ्या, झुमके असे 5 तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 80 हजार रुपये असा 1 लाख 80 हजाराचा ऐवज पळवला. अज्ञात चोरट्याविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तरोणे करीत आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या