
पुणे शहरातील डावी भुसारी कॉलनीतील श्रीगणेश अपार्टमेंट आणि दत्तनगरमधील साई लुकवड रेसिडेन्सीमधील फ्लॅटमध्ये चोरट्यांनी घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही घटनेत 1 लाख 15 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर परिसरात असलेल्या साई लेकवूड रेसीडन्सीमधून चोरटयांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून सोन्याचे दागिने आणि रोकड असा 89 हजार रूपयांचा ऐवज चोरला. दिपीका संजय तुळसकर (वय 44, रा. दत्तनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ही घटना 24 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड येथील डावी भुसारी कॉलनीतील अक्षय आनंदराव पाटील (वय 28, रा. मोकाटेनगर, श्रीगणेश अपार्टमेंट) यांच्या खोलीचा दरवाजा उघडून चोरट्यांनी बॅग, लॅपटॉप, मोबाईल असा 26 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कोथरूड पोलिसांकडून तपास सुरू आहे.


























































