
बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 10 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना कासेवाडीत घडली आहे. याप्रकरणी संगीता अनिल केदारी (वय 47) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
संगीता 14 डिसेंबरला कामासाठी बाहेर गेल्या होत्या. त्यानंतर चोरटे त्यांच्या घराचा कुलूप कडी-कोयंडा तोडून आत शिरले. डब्यात ठेवलेले 10 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. घरी आल्यानंतर त्यांचा चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी खडक पोलीस अधिक तपास करत आहेत.



























































