कुरीयर कंपनीतून तिजोरीसह तीन लाखांची रोकड लुटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकच्या आडगाव शिवारातील एका कुरीयर कंपनीचे कार्यालय फोडून चोरट्यांनी तिजोरीसह 3 लाख 21 हजार 812 रूपये लंपास केले. जेलरोडच्या गोदावरी हौसिंग सोसायटीतील प्रशांत भालचंद्र कोहक यांचे आडगाव शिवारातील गणेश मार्केटमध्ये इ-कॉम एक्स्प्रेस या कुरीयर कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयातील कर्मचारी सोमवारी सकाळी साडेआठ वाजता आले असता दरवाजाचा कडीकोयंडा तोडलेला आढळला. चोरट्यांनी आतून तिजोरी व डीव्हीआर रेकॉर्डिंग मशीन असे साहित्य चोरल्याचे लक्षात आले. त्या तिजोरीत 3 लाख 21 हजार 812 रुपयांची रोकड होती. याप्रकरणी कोहक यांच्या तक्रारीवरून आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.