सबरीमाला मंदिरात चोरी, मुख्य पुजाऱ्याला अटक

केरळमधील प्रसिद्ध सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरीप्रकरणी शुक्रवारी एसआयटीने मंदिराचे मुख्य पुजारी पंडारारू राजीवारू यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.  पंडारारू राजीवारू हे मंदिरातील वरिष्ठ धार्मिक अधिकारी असून पूजेचे साहित्य आणि दागिन्यांपर्यंत त्यांचा थेट संबंध येतो. या चोरीच्या प्रकरणात त्यांची मुख्य भूमिका असू शकते, असा एसआयटीला संशय आहे.

काही वर्षांपूर्वी सबरीमाला मंदिरातील चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी एसआयटीने केलेल्या तपासामध्ये चोरीच्या घटनेमध्ये मंदिरातील अंतर्गत व्यक्तींचा संबंध असू शकतो, अशी माहिती समोर आली होती.