लातूररोड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

चाकूर तालूक्यातील मौजे लातूर रोड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील एलईडी टीव्ही, सीसीटीव्ही कॅमेरे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहेत. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीप्रकरणी मुख्याध्यापक अनिल संग्राम डावळे यांनी तक्रार दाखल केली आहे. शाळेतील दुसरीच्या वर्गाचा लोखंडी पत्र्याचा दरवाजा कापून चोरट्यांनी कुलूप आणि कडीकोंयडा उचकटून काढला. शाळेतील 32 इंचाचा एलईडी टि.व्ही. आणि शाळेच्या व्हराड्यांत लावलेले 3 सीसीटीव्ही कॅमेरेही पळवण्यात आले. सुमारे 16 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.