
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धसका बहुतेकांनी घेतला आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलीय, पण राज्यात कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्याचा सध्या तरी विचार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई लोकलवर निर्बंध लादल्याने अनेकांच्या नोकऱयांवर गदा येईल. शाळाही बंद होणार नाहीत. पण शाळेत कोकिडचे नियम पाळणे गरजेचे आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. देशातून येणाऱया प्रकाशांना विलगीकरण अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले. तिसरी लाट अपेक्षित धरून प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. ज्या-ज्या गोष्टींची आवश्यकता असेल, तशी तयारी करीत आहोत़, असे ते म्हणाले.


























































