गणेशभक्तांसाठी रात्रभर लोकल धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी गणेशदर्शन तसेच विसर्जन सोहळ्याच्या निमित्ताने उसळणारी गर्दी पाहता मध्य रेल्वेने 20 तर पश्चिम रेल्वेने 16 विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेकडून शनिवारी रात्रीपासून ते विसर्जनाच्या दिनापर्यंत 7 ते 12 सप्टेंबरपर्यंत 20 विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे, तर पश्चिम रेल्वे एकूण 16 फेऱया चालविणार असून 8 फेऱ्या 7 सप्टेंबरच्या रात्री तर 8 फेऱ्या 12 सप्टेंबरच्या रात्री चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने रविवार, 8 सप्टेंबरचा साप्ताहिक मेगाब्लॉकही रद्द केला असून बेस्टनेही 18 जादा फेऱ्या सुरू केल्या आहेत.

हार्बर लाइन स्पेशल

8 आणि 13 सप्टेंबर सीएसएमटीहून मध्यरात्री 1.30 वा. लोकल सुटून पनवेलला मध्यरात्री 2.50 वा. पोहचेल. सीएसएमटीहून मध्यरात्री 2.45 वा. लोकल सुटून पनवेलला पहाटे 4.05 वा. पोहचेल. पनवेलहून मध्यरात्री 1 वा. लोकल सुटून सीएसएमटीला मध्यरात्री 2.20 वा.पोहचेल. पनवेलहून मध्यरात्री 1.45 वा. लोकल सुटून मध्यरात्री 3.05 वा. सीएसएमटीला पोहचेल.

मेन लाइन स्पेशल

7 आणि 12 सप्टेंबर रोजी कल्याणहून रा. 11.55 वा. गणपती स्पेशल सुटून सीएसएमटीला मध्यरात्री 1.22 वा. पोहचेल. 8 आणि 13 सप्टेंबरला सीएसएमटीहून मध्यरात्री 1.35 वा. कल्याण स्पेशल सुटून मध्यरात्री 3.05 वा. पोहचेल. सीएसएमटीहून मध्यरात्री 2.30 वा. ठाणे स्पेशल सुटून मध्यरात्री 3.30 वा. ठाणे येथे पोहचेल. सीएसएमटीहून मध्यरात्री 3.30 वा. कल्याण स्पेशल सुटून कल्याणला पहाटे 5 वा. पोहचेल. ठाण्याहून मध्यरात्री 1.00 वा. गणपती स्पेशल सुटून ठाण्याला मध्यरात्री 2.00 वा. पोहचेल. ठाण्याहून मध्यरात्री 2.00 वा. गणपती स्पेशल सुटून सीएसएमटीला मध्यरात्री 3 वा. पोहचेल.

पश्चिम रेल्वेच्या गणपती स्पेशल

पहिली लोकल चर्चगेटहून मध्यरात्री 1.15 वा. सुटून विरारला मध्यरात्री 2.50 वा.पोहचेल. दुसरी लोकल चर्चगेटहून मध्यरात्री 1.55 वा. सुटून विरारला मध्यरात्री 3.32 वा. पोहचेल. तिसरी लोकल चर्चगेटहून मध्यरात्री 2.25 वा. सुटून पहाटे 4.02 वा.विरारला पोहचेल. चौथी लोकल चर्चगेटहून मध्यरात्री 3.20 वा. सुटून विरारला पहाटे 4.58 वा.पोहचेल.