
WhatsApp यूझर्ससाठी एक चांगली बातमी आहे. यूझर्सच्या मागणी नुसार यात नवे फीचर्स अॅड केले जातात. या महिन्याच्या सुरुवातीला WhatsApp ने नवं प्रायव्हसी फीचर जारी केलं आहे. ज्यामध्ये यूझर्सना अधिक कंट्रोल दिला आहे.
WhatsApp च्या नव्या फीचरनुसार पर्याय जारी करण्चात आले आहे. यामध्ये My Contacts Except असे पर्याय देण्यात आले आहेत. आता कंपनीने सर्व यूझर्ससाठी हे फीचर जारी केले आहे.
यासंदर्भात WABetaInfo ने रिपोर्ट केला आहे. रिपोर्टनुसार अॅपच्या अपडेटेड व्हर्जन 2.2146.5 सोबत हे फीचर वेब आणि डेस्कटॉपच्या यूझर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
मेसेजींग अॅपच्या फीचरने यूझर्स लास्ट सीन, स्टेटस, प्रोफाइल फोटो आणि अबाउट डिस्क्रिप्शन WhatsApp वर कोण पाहू शकेल हे निश्चित करता येते. प्रायव्हसी सेटिंगमधून हे फीचर अॅक्सेस करता येते.
WhatsApp मध्ये आता Everyone, MyContacts आणि Nobody चे पर्याय दिले आहेत. या फीचरमुळे यूझर्स लास्ट सीन, स्टेटस, प्रोफाइल फोटो आणि अबाउट डिस्क्रिप्शन कोणाला दिसतील हे निश्चित करता येईल.
यूझर्स या फीचरची वाट बऱ्याच काळापासून पाहात होते.




























































