वाईन्सचे गोडाऊन फोडुन लाखोंचा माल चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

शहरातील राजासहाब वाईन्सचे गोडाऊनवर चोरट्यांनी डल्ला मारला. गोडाऊन  फोडून चोरट्यांनी सुमारे 12 लाख 75 हजार रुपयांचा मद्यसाठा चोरून नेल्याची माहिती समोर आली. सोमवारी पहाटेच्या सुमारास नगर – पुणे मार्गावरील पुणे बसस्थानकाच्या शेजारी रस्त्यावरील गोडाऊनमध्ये ही चोरी झाली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्टेशन रस्त्यावरील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर राजासहाब वाईन्स नावाचे दुकान आहे. दुकानाच्या पाठीमागील बाजूस मद्यसाठा ठेवण्यासाठी गोडाऊन करण्यात आलेले आहे. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचा पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्या दुकानातील असलेल्या लॉकरमधून अज्ञात चोरट्याने चाव्या घेऊन मागील बाजुस असणार्‍या गोडाऊनमधून दारुचे खोके, विदेशी दारु, रुपये 12 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. आज सकाळी ही घटना लक्षात आल्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक जयंती मिना यांच्यासह शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्यासह कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी गोडाऊनची पाहणी केली होती. तसेच आजु बाजुलचे सीसीटीव्ही पुटेल त्यांनी तपासण्यास सुरवात केली आहे. शहरातील मध्यवर्ती भागामध्ये हे वाईनशॉप असून हे जगताप कुटुंबाच्या नावाने याचा परवाना आहे. या प्रकरणी सुरेश जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांना अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आसून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक शिवाजी नागवे हे करीत आहे.