लातूरात बंद घर चोरट्यांनी फोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घराला कुलूप लावून शिर्डीला दर्शनासाठी गेलेल्या कुटूंबाचे घर अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द 89 हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या चोरी प्रकरणी सुभाष चंद रामनाथ यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, ते आपल्या कुटूंबासह घराला कुलूप लाऊन शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते. दौंडला पोहोचल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तोंडल्याची रखवालदाराने फोनवरून माहिती दिली. त्यामुळे ते दौंड येथून परत आले. यावेळी घरातील अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण (किंमत 35 हजार रुपये), सात ग्रॅम वजनाचे कानातील फुले (किंमत 20 हजार रुपये), सोन्याचे एक तोळ्याचे कानातील झुमके (किंमत 18 हजार रुपये), पाच ग्रॅम वजनाचे सरपाळे (किंमत 12 हजार रुपये), चांदीचे 16 नाणे (किंमत 4 हजार रुपये) असा एकूण 89 हजार रुपयांचा ऐवज पळवण्यात आला. या अज्ञात चोरट्यांविरुध्द पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील ताप स सुरु आहे.