चोरट्यांचा थेट एटीएम मशीनवर डल्ला; शिरूर ताजबंदमधील बँकेचे एटीएम मशीन पळवले

अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम मशीन शुक्रवारी मध्यरात्री एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान पळवली. अज्ञात 5 ते 6 चोरट्यांनी सिल्वर कलरच्या तवेरा गाडीने येत ही मशीन लांबवले. याबाबतची माहिती अहमदपूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.आर. देडे यांनी दिली आहे.

शिरूर ताजबंद येथील बसस्थानक जवळील उदगीर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भरवस्तीत स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे एटीएम आहे. येथे सीसीटिव्ही कॅमेरे आहेत. मात्र, सुरक्षा रक्षक नाहीत. भर वस्तीतीत बँकेचे एटीएम चोरट्यांनी काच फोडून लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. असून, पोलीसांनी तपासाला सुरूवात केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाने पोलिसांनी रात्रीची गस्त करावी म्हणून पत्र देत मागणीही केली आहे, असे सरपंच मच्छिंद्र वाघमारे यांनी सांगीतले.

शिरूर ताजबंद राष्ट्रीय महामार्गावरील चौरस्त्याचे शहर मोठ्ठी बाजारपेठ असून पन्नास गावांचे केंद्र आहे. आठवडी बाजारपेठ सुध्दा आहे. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असायला पाहिजे, असे ग्रामस्थांनी पोलीसांना वारंवर सांगीतले आहे. पोलीस निरीक्षक देडे यांनी सोशल मिडीयातून सीसीटिव्ही फुटेज मधील फोटो टाकून सिल्वर कलरची तवेरा गाडी व एटीएम मशिन आढळून आल्यास संपर्क करण्याचे जनतेला आवाहन केले आहे.