
कर्नाटकात एका माणसाला तृतीयपंथीयावर प्रेम प्रकरण चांगलंच महागात पडलं असून या प्रकरणात त्याला जीव गमवावा लागला आहे. कर्नाटकतील सुंकडकट्टे येथील हेगनहळ्ळी इथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
रोजा असं या तृतीय पंथीयाचं नाव आहे. रोजाचे या परिसरात रिक्षा चालवणाऱ्या मनोज कुमार (20) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. जवळपास चार वर्षं हे प्रेमप्रकरण सुरू होतं. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांचं बिनसायला सुरुवात झाली होती. कारण, रोजाचं शिवाराजू नावाच्या दुसऱ्या रिक्षावाल्याशी सुत जुळलं होतं. त्यामुळे रोजाने मनोजला टाळायला सुरुवात केली. त्यावरून मनोज आणि रोजामध्ये कडाक्याचं भांडण होऊ लागलं. शिवाराजूला सोडून रोजाने आपल्याकडे यावं असा मनोजचा हट्ट होता.
या रोजच्या भांडणाला कंटाळलेल्या रोजाने शिवाराजूच्या मदतीने मनोजचा काटा काढला. पोलिसांनी या प्रकरणात शिवाराजू आणि रोजासह प्रताप आणि सत्या या दोन आरोपींना अटक केली आहे. या चौघांनी संगनमताने मनोजची हत्या केल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.



























































