देवगड तालुक्यातील 97 गावांना ओडीएफ प्लसचा दर्जा

देवगड तालुक्याने ओडीएफ प्लस बाबतचे सर्व निकष पुर्ण केले असुन देवगड तालुक्यातील 97 गावंही ओडीएफ प्लस दर्जा प्राप्त केल्याची माहिती गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी दिली .

देवगड तालुका 2015 मध्ये सिंधुदूर्गातील पहिला हागणदारीमुक्त तालुका होण्याचा मान देवगड तालुक्याला प्राप्त झाला होता . यामध्ये सातत्य राखत देवगड तालुक्यातील 97 गावही हागणदारी मुक्त होण्याचा मान मिळाला असुन अशी कामगिरी करणारा देवगड तालुका सिंधुदूर्गातील तिसरा तालुका ठरला आहे. या अगोदर हा दर्जा कुडाळ व वेगुर्ले तालुक्याने प्राप्त केलेला आहे .

हागणदारी मुक्त अधिक गाव संकल्पनेत गावातील कुंटूबाकडे वैयक्तिक शौचालये, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत निकष पुर्ण केलेले आहेत . यावेळी हागणदारी मुक्त अधिक तालुका करण्यासाठी जिल्हा परिषद सिंधुदूर्गचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर , जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी .विनायक ठाकुर यांचे मार्गदर्शन तसेच पंचायत समिती देवगड अधिकारी , कर्मचारी तसेच गावपातळीवर सरपंच , ग्रामविकास अधिकारी , ग्रामसेवक , ग्रामपंचायतीची संपुर्ण टीम , लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ या सर्वानी सांघिक प्रयत्न केल्यामुळेच हा तालुका हागणदारीमुक्त अधिक झाला असुन आता हा दर्जा टिकवुन ठेवण्यासाठी गावागावात पाणी व स्वच्छतेबाबत नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्याचे ध्येय असल्याचे मत गटविकास अधिकारी वृक्षाली यादव यांनी स्पष्ट केले .