तीस कोटीच्या कामाच्या वाटपाच्या कारणावरून महानगरपालिकेत गोंधळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर शहर महानगरपालिकेतील 30 कोटी रूपयांच्या कामाच्या वाटपावरून जोरदार गोंधळ झाला. ठराविक गुत्तेदारांना कामाचे वाटप करण्यासाठी दार बंद करून कारभार सुरू असताना काँग्रेसचे माजी महापौर दीपक सुळे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत सर्वांचे टेंडर भरून घ्या असा सज्जड दम दिला.

महानगरपालिकेच्या कार्यालयास जञेचे स्वरूप प्राप्त झालेले होते. सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांना टेंडर मिळवून देण्यासाठी दार बंद करून घेऊन अधिकाऱ्यांवर दबाव टाकत कामकाज उरकत होते. काँग्रेसचे माजी महापौर दीपक सुळे यांनी महापालिकेत जोरदार राडा घातला. प्रशासनाच्या वतीने जाणीवपूर्वक विशिष्ट व्यक्तींनाच या कामाचे वाटप करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप इतर ठेकेदार करीत होते. पालिका कार्यालयात यावरून प्रचंड गोंधळ, तावातावाने बोलणे यातून पालिकेचा परिसर तणावपूर्ण झालेला होता. कामाच्या अपेक्षेने मोठ्या संख्येने महापालिका परिसरात गुत्तेदार दाखल झालेले होते.

छोटे-छोटे ठेकेदार एकत्रित आले होते. त्यावेळी त्यांना महापालिकेचे प्रवेशद्वार बंद असल्याचे दिसून आले. आपल्या मर्जीतील व्यक्ती, ठेकेदार यांना कार्यालयात बोलावून कामाचे वाटप करण्यात येत आहे. हे पाहून त्या ठेकेदारांनी पालिकेच्या काही माजी पदाधिकाऱ्यांना फोन करून ही माहिती दिली. त्यावेळी अनेक माजी पदाधिकारी कार्यालयात आले.

ही कामे विशिष्ट व्यक्तींना न देता शहरातील सर्वच छोट्या-छोट्या ठेकेदारांना देण्यात यावीत अशी मागणी यावेळी करण्यात येत होती. माझी महापौर दीपक सुळे यांनी गपचूप सर्व गुत्तेदारांचे टेंडर दाखल करून घ्या अन्यथा कुत्र्यागत मारेल असा दम दिला माझ्यावर 353 करताल तर मी तुमच्यावर 100 केसेस करेन. आता डीडी घेऊन लोक बाहेर थांबलेत तुमच्या काय बापाची खिरापत आहे का सगळे काय लोक पागल आहेत? का सगळ्यांचे टेंडर भरून घ्या असा दम दिला. महानगरपालिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.