
दिवाळीमध्ये बहुतांशी घराची सजावट करण्यासाठी झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो. झेंडू केवळ देवासाठी किंवा सजावटीसाठी नाही तर, झेंडूचे फुल हे आपल्या सौंदर्यासाठी सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.
सौंदर्य टिकवण्यासाठी केवळ महागड्या वस्तू गरजेच्या नसतात. तर सौंदर्य टिकवण्यासाठी आपल्याकडे दूरदृष्टी आणि योग्य माहिती गरजेची असते. झेंडू हे एक असे फूल आहे जे प्रत्येक शुभ कार्यासाठी वापरले जाते. मुख्य म्हणजे झेंडूचे फूल हे बारमाही उपलब्ध असते. पूजा असो किंवा लग्न असो झेंडूच्या फुलाशिवाय सण समारंभ हा अपूर्ण असतो.
दिवाळीनंतर मधुमेही रुग्णांनी कोणत्या चाचण्या करणे आवश्यक आहे, जाणून घ्या
झेंडूचे फुल त्वचेला लावण्याचे फायदे
झेंडूच्या फुलात असलेले फ्लेव्होनॉइड्स सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्याचे काम करतात.
झेंडुच्या फुलात अँटीबॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट आणि सुखदायक गुणधर्म आहेत. यामुळे त्वचा निरोगी राहते.
चेहरा सुंदर दिसण्यासाठी नानाविध उपाय करुन थकलात, आता वापरा या डाळीचे पीठ, रिझल्ट पाहून थक्क व्हाल
झेंडूच्या फुलात त्वचेला उजळवण्याचे गुणधर्म आहेत. यामुळे त्वचेवरील काळे डाग, टॅनिंग आणि पिग्मेंटेशन कमी होतात.
झेंडूच्या पाकळ्यांपासून बनवलेले सीरम त्वचेला खोलवर हायड्रेट करते. पुरळ, लालसरपणा किंवा जळजळीची समस्या असेल तर हे फूल खूप फायदेशीर आहे.
आजकाल ताणतणाव, प्रदूषण, कमी झोप आणि सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे, अकाली वृद्धत्व सुरू होते. त्याचबरोबर त्वचेलाही नुकसान होते. अशा परिस्थितीत झेंडूची फुले त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत.
झेंडूच्या फुलांचा फेस पॅक करण्यासाठी 9-12पाकळ्या घ्या. त्या धुवून चांगल्या प्रकारे बारीक करा. आता त्यात 1 चमचा बेसन, 2 चमचे कच्चे दूध आणि 1 चमचा गुलाबपाणी मिसळा. ही पेस्ट 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर चेहरा पाण्याने धुवा.


























































