
आपल्या चेहऱ्यासोबत हातांच्या सौंदर्याकडेही लक्ष देणं खूप गरजेचं आहे. अनेकदा आपण फक्त चेहऱ्याच्या सौंदर्याकडे लक्ष देतो. हात मात्र कायम दुर्लक्षित राहतात. उन्हामुळे टॅनिंग झालेले हात आपल्या सौंदर्यात बाधा आणतात. म्हणूनच चेहऱ्याच्या सौंदर्यासोबत हातांची काळजी घेणंही गरजेचं असतं.
कोरियन मुलींसारखे सुंदर केस हवे असतील तर, ‘हा’ हेअर पॅक नक्की करुन बघा
हातांची काळजी घेण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय हे खूप महत्त्वाचे आहेत. यातील काही साधे सोपे आणि खिशालाही परवडणारे घरगुती उपाय आपण बघुया.
लिंबु आणि मध
लिंबामध्ये विटामिन सी असल्याने त्वचेला उजळवण्यास मदत करते.
१ चमचा लिंबाचा रस त्यात एक चमचा मध घालून मिक्स करावे. १० ते १५ मिनिटे हाताला हलक्या हाताने मसाज करावा .आठवड्यामधून ३ वेळा तरी हा उपाय नक्की करा.
बेसन आणि दही मास्क
दही त्वचेला मऊ करतं आणि बेसन एका स्क्रब प्रमाणे काम करतं.
२ चमचे बेसनात १ चमचा दही आणि चिमुटभर हळद घालावी. हे मिश्रण हाताला लावून १० ते १५ मिनिटे सुकवावं आणि पाण्याने स्वच्छ धुवावे.
बटाट्याचा रस
बटाटा त्वचेला नैसर्गिकरित्या उजळवतो.
बटाट्याचा रस काढून त्वचेला १० ते १५ मिनिटे लावावा.
हा उपाय रोज केल्याने आठवड्याभरात तुम्हाला योग्य तो निकाल नक्की मिळेल.
रोज रात्री झोपताना हातांना नारळाचे तेल, कोरफड चे जेल लावावे. जे त्वचेला मऊ करुन त्वचेचा रंग सुधारवतं.