यंदाचा हिवाळाही भाजून काढणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

यंदाचा हिवाळाही भाजून काढणार असून दुष्काळस्थिती आणखी गंभीर होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहीले. मराठवाडा, विदर्भ अक्षरशः पोळून निघाले. कमी पावसामुळे जलयुक्त शिवार योजनेचे बारा वाजले. नद्या, विहिरी आटल्यामुळे राज्यात दुष्काळीस्थिती गंभीर आहे. हिवाळ्यातही उन्हाचे चटके बसणार असून थंडीचा नामोनिशाण नसेल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

अल निनो म्हणजे काय ?
प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याचे तापमान वाढते तर पश्चिमेकडील हवेचा दाब वाढतो. वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहू लागतात. हे वारे ढग त्यादिशेने वाहून नेतात. त्यामुळे पूर्वेकडील भागात अतिवृष्टी, तर पश्चिमेकडील भागात दुष्काळी स्थिती निर्माण होते. अशाप्रकारे अल निनोचा प्रभाव दिसतो.

सध्या अल निनोची लक्षणे प्रशांत महासागरात दिसत नसल्याचे ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले. परंतु नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये अल निनोचा प्रभाव राहाण्याची शक्यता असून महाराष्ट्रातले तापमान वाढत जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

नोव्हेंबर-डिसेंबर कडक उन्हाचा
नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक भागात तापमान वाढलेलेच दिसेल. त्यामुळे कपाटात ठेवलेले गरम कपडे बाहेर काढण्याचा मुहूर्तच मुंबईकरांना मिळणार नाही. अशी परिस्थिती असेल.

नोव्हेंबरमध्ये अल निनोच्या प्रभावाबाबत हवामान विभागाकडून संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तापमान चढेच राहील. खरीप हंगामावर परिणाम झाला. कमी पावसामुळे उत्पादनात घट झाली. यंदा सरासरीइतका म्हणजेच 97 टक्के पाऊस होईल असा हवामानाचा अंदाज होता. परंतु त्याच्या उलट परिस्थिती होती. प्रत्यक्षात 9.4 टक्के तूट दिसली.

हिवाळ्यावर कसा परिणाम होणार ?
सुरुवातीला प्रशांत महासागराचे तापमान वाढेल. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, हिवाळ्यातही तापमान वाढलेलेच राहील, असे वरिष्ठ वैज्ञानिक ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले.

summary- this winter can be heated than every year