
राणा दांपत्य आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. यशोमती ठाकूर यांनी आक्रमक पावलं उचलत नवनीत राणा यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आता आमदार बच्चू कडू यांनी देखील या वादात उडी घेतली आहे.
बच्चू कडू यांनी राणा दांपत्यावर टिका करताना, ‘नवनीत राणा जे विधान केलं, त्यावर आम्ही पत्र देणार आहोत. पैसे देणं आणि घेणं दोन्ही चूकच आहे. त्यांनी स्वत: म्हटलं दिलं. याची चौकशी व्हायला पाहिजे आणि सत्य समोर यायला हवं’, असं कडक शब्दात सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, ‘यशोमती ठाकूर यांचं बरोबर आहे. स्वत: उमेदवार म्हणतोय की आम्ही पैसे दिले. मग पहिला दोषी कोण देणारा आणि घेणारा पण तेवढाच दोषी आहे. याची चौकशी झाली पाहिजे’. आता बच्चू कडू यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राणा दांपत्य आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यशोमती ठाकूर यांनी लोकसभा निवडणुकीत राणा दांपत्याचा प्रचार करण्यासाठी रवी राणा यांच्याकडून कडक नोटा घेतल्याचा आरोप केला होता. मात्र हे आरोप फेटाळून लावत यशोमती ठाकूर यांनी अब्रुनुकसानिचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं आहे.