अलिबागच्या खाडीत हजारो बोटींचा ‘रास्ता रोको’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ओखी वादळामुळे बोटी किनाऱ्याला

3 जानेवारीला साखरआक्षीत आंदोलन

शासनबंदी धाब्यावर बसवून एलईडी मच्छीमारी सुरूच असल्याने पारंपरिक मासेमारी करणाऱया कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मच्छीमारांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून त्याचे पहिले पाऊल म्हणून 3 जानेवारीला अलिबागच्या साखरआक्षी खाडीत एक हजार बोटी धक्क्याला लावून ‘रास्ता रोको’ करण्यात येणार आहे. या आंदोलनाची दखल घेतली न गेल्यास 29 जानेवारीला भरसमुद्रात आंदोलन करण्याचा इशारा मच्छीमारांनी दिला आहे.

एलईडी, पर्सनीट, बुलनेट या अनधिकृत मच्छीमारीला बंदी असताना काही मच्छीमार हे अकैधपणे समुद्रात मासेमारी करीत आहेत. एलईडी मासेमारीमुळे मोठय़ा माशांसह छोटे मासे, जीकजंतू हेसुद्धा जाळ्यात येतात. त्यामुळे समुद्रात माशांची व्याप्ती कमी झाली आहे. एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारी करणाऱया कोळीबांधकांना मासे मिळणे कठीण झाले आहे. याविरोधात रायगडातील सर्व पारंपरिक मच्छीमार एकवटले असून आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला. यावेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर, रायगड जिल्हा कोळी समाज संघ अध्यक्ष धर्मे घाबरट, राज्य सरचिटणीस संजय कोळी, मोतीराम पाटील तसेच सर्क मच्छीमार संघाचे चेअरमन, सदस्य उपस्थित होते.

मच्छीमाऱयांच्या इशाऱयानंतर फिशरिज विभागाला जाग

उरण – एलईडी मच्छीमारीविरोधात पारंपरिक मच्छीमार आंदोलनाच्या तयारीत असतानाच उरणच्या समुद्रात रायगड फिशरिज विभागाने धडाकेबाज कारवाई करत पाच मच्छीमार बोटींवर कारवाई केली. फिशरिज विभागाचे सहायक प्रभारी परवाना अधिकारी रत्नाकर राजम यांनी उरणचे अधिकारी स्वप्नील दाभाणे यांच्या पथकासह उरण सागरी परिसरात दोन रात्र गस्त घालून एलईडी मासेमारी करणाऱयांवर झडप घातली. त्यांच्याकडून लाखो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पर्सनेट मासेमारीबद्दल संभ्रम

एलईडीसोबत पर्सनेट मासेमारीकरही बंदी आहे. मात्र पर्सनेट मासेमारीबाबत जिल्ह्यातील कोळी बांधकांची भूमिका परस्पर केगळी असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.