
पीककर्ज काढून, हातउसने पैसे घेऊन आणि पत्नीचे दागिने गहाण ठेवून कांदा पिकाची लागवड केली. ऐन काढणीच्या वेळी अवकाळीने दगा दिला. अख्ख्या शेताचे तळे झाले आणि हजारो क्विंटल कांदा पीक शेतातच सडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामुळे निफाड आणि येवला तालुक्यातील शेतकरी हवालदील झाले आहेत. आर्थिक संकटामुळे त्यांना अश्रू अनावर होत आहेत. संपूर्ण जिह्यात अशाप्रकारे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.