
बांधकाम व्यावसायिकाला दोन कोटींच्या खंडणीसाठी धमकीचा फोन आल्याची घटना घडली आहे. व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास खंडणीविरोधी पथकदेखील करत आहेत.
तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या कंपनीकडून शहरात काही ठिकाणी इमारत बांधणीची कामे सुरू आहेत. अंधेरी येथे एका प्रोजेक्टमध्ये त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले. कोर्टाने तक्रारदारांच्या बाजूने निर्णय दिला होता. सध्या तो प्रोजेक्ट बंद आहे. काही दिवसांपूर्वी तक्रारदारांना एका आंतरराष्ट्रीय नंबरवरून दोन कोटींच्या खंडणीसाठी फोन आला. खंडणी न दिल्यास गोळ्या घालू, अशी तक्रारदारांना धमकी दिली होती. व्यावसायिकाच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.























































