
देश सोडून जाणाऱ्या श्रीमंतांची संख्या सतत वाढत आहे. हे लोक दुसऱ्या देशात स्थायिक होत आहेत. 2024 साली 2.06 लाखांपेक्षा जास्त हिंदुस्थानींनी देश सोडला. यामध्ये बहुतांश करोडपतींचा समावेश आहे. हेनले अँड पार्टनरच्या अभ्यासानुसार, 2025 साली सुमारे 3500 करोडपती देश सोडू शकतात. त्यांच्याकडे एकूण 26.2 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. गेल्या वर्षी 4300 करोडपती देश सोडून गेले होते. 2011 पासून आतापर्यंत 17. 5 लाख हिंदुस्थानींनी नागरिकत्व सोडलंय.
कारण काय?
हेनले अँड पार्टनरच्या अहवालानुसार चांगले राहणीमान आणि आरोग्य सेवा, नोकरी-धंद्याच्या संधी, कमी टॅक्स आणि सुरक्षितता यांचा विचार करून धनाढ्य लोक विदेशात स्थायिक होत आहेत.
अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियात चांगली विद्यापीठ आहेत. दुबई, सिंगापूर या देशांमध्ये टॅक्स कमी आहे.
हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये हिंदुस्थानी पासपोर्ट 76 व्या स्थानी आहे. फक्त 58 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येतो. तर अमेरिकन पासपोर्टवर 193 देशांमध्ये, कॅनडा पासपोर्टवर 186 देशांमध्ये, सिंगापूरचा पासपोर्टवर 192 देशांमध्ये व्हिसा शिवाय प्रवास करता येतो.