हल्ली प्रत्येकजण स्मार्टफोनचा वापर करतो. प्ले स्टोअरवर असे काही ऍप्स आहेत जे संकटकाळात एखाद्या देवदूताप्रमाणे तुमच्या मदतीला धावून येतील.
112 इंडिया ऍप ः या ऍपच्या माध्यमातून पोलीस, रेल्वे, फायर ब्रिगेड यांसारख्या सेवांसाठी एसओएस बटण मिळते. हे बटण दाबल्यावर इमर्जन्सी वैद्यकीय मदत मिळते.
बी सेफ ः या ऍपमध्ये तुमच्या इमर्जन्सी काँटॅक्टना तुमचे लाईव्ह लोकेशन मिळते. तसेच तुमचे मित्र आणि नातेवाईक तुमची स्थिती पाहू आणि ऐकू शकतात.
ई-रक्तकोश ः रक्ताची गरज भासल्यास ई-रक्तकोशचा वापर करता येतो. याद्वारे तुम्हाला जवळच्या ब्लड बँकेची माहिती मिळेल.