
परळीजवळ दौतपुर शिवारात असलेल्या खदाणीत तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. या ठिकाणी साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका 15 वर्षांच्या मुलीसह तिची लहान बहीण आणि भावाचा बुडून मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये एकाच घरातील तीन मुलांचा समावेश आहे.
परळीजवळ दौतपूर ते औष्णिक विद्युत केंद्र रोडवर खदान आहे. या खदानीत पाणी साचले होते. सोमवारी सकाळी कपडे धुण्यासाठी याच परिसरात राहणाऱ्या दगडफोड करणाऱ्या कुटुंबातील एक 15 वर्षीय मुलगी कपडे धुण्यासाठी खदानीमध्ये गेली होती. तिच्यासोबत लहान बहीण आणि भाऊ होता. त्यावेळी या तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटना समजताच नातेवाईकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले. हे तिघे नांदेड जिल्ह्यातील वसुरणी येथून आले होते.




























































