चंद्रपूरमध्ये CRPFच्या तीन जवानांना कोरोनाची लागण, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 125 वर

340

चंद्रपूरमध्ये कोरोनाचे 7 रुग्ण आढळले आहेत. त्यात तीन सीआरपीएफ जवानांचा समावेश आहे. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह असला तरी कोणतेही लक्षणे नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या तिघांना वगळता चंद्रपूर जिल्ह्यातील रविवारी 121 वर असणारी कोरोना पॉझिटीव्ह संख्या वाढून सोमवारी 125 झाली आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत 62 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. तर सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 63 आहे. मंगळवारी दुपारी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून ही माहिती देण्यात आली.

पुणे येथील रहिवाशी असलेल्या आणि संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या 23, 53 व 23 वयाच्या तीन जवानांचे  स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत. हे सर्व पुणे येथून आले होते. एक जुलैला एकाच ठिकाणी हे तीनही जवान संस्थात्मक अलगीकरणात होते. तर सोमवारी दिवसभरात एकूण 4 रुग्ण चंद्रपूर जिल्हयात पॉझिटीव्ह ठरले आहे. यामध्ये नागपूरच्या कामठी परिसरातून 26 जून रोजी परत आलेल्या 27 वर्षीय ऊर्जानगर येथील रहिवासी असणाऱ्या व्यक्तीचा स्वॅब सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्हयातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 125 वर पोहोचली आहे. आतापर्यत 62 रुग्ण बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. उर्वरित 63 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या