
जुलैमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकार गटांगळ्या खात असताना कर्नाटकाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. आता येथील भाजप सरकारच्या खातेवाटपाने लक्ष वेधून घेतले आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी 17 नव्या मंत्र्यांकडे खातेवाटप करताना राज्यात पहिल्यांदाच तिघांना उपमुख्यमंत्री बनवले. ही येडियुरप्पा यांनी सरकारभोवती केलेली भक्कम तटबंदी असल्याचे बोलले जात आहे. गोविंद कारजोल, अश्वथ नारायण आणि लक्ष्मणी सावदी अशी कर्नाटकच्या नव्या उपमुख्यमंत्र्यांची नावे आहेत. या तिघांकडे अन्य खात्यांचाही कार्यभार सोपविला आहे.


























































