उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून तीन ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । उल्हासनगर

गोपबेहेरानी चौकातील मेमसाब इमारतीचा स्लॅब रविवारी दुपारी 2 च्या सुमारास थेट एका दवाखान्यावर कोसळला. त्यामुळे नीतू साजेदा (8), अनिता मौर्या (25), प्रिया मौर्या (2) हे तीन पेशंट जागीच ठार झाले असून त्यात दोन वर्षांच्या चिमुकलीचा समावेश होता. या दुर्घटनेत सहाजण गंभीर जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे. या घटनेमुळे महापालिका क्षेत्रातील 247 धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.