इटलीत भीषण अपघातात दोन हिंदुस्थानी ठार

इटलीच्या ग्रोसेटोमध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातात दोन हिंदुस्थानी नागरिकांसह तीन जणांचा मृत्यू झाला. ऑरेलिया स्टेट रोडवर एका व्हॅनने 9 सीटच्या मिनी बसला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत छोटय़ा मुलांसह पाच जण जखमी झाले. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इटलीतील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेले नागरिक हे नागपूरचे रहिवासी होते.