मसुरे – डांगमोडे ग्रामपंचायतीचे त्रिभाजन: मर्डे, बिळवस, देऊळवाडा नव्या ग्रामपंचायती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

मालवण तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असणारी मसुरे – डांगमोडे आता इतिहासजमा झाली आहे. या ग्रामपंचायतीचे त्रिभाजन करण्यात आले आहे. येथे मर्डे, बिळवस, देऊळवाडा अशा तीन ग्राम पंचायती निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मालवण तालुक्यातील ग्राम पंचायततींची संख्या आता ६५ झाली आहे. याबाबत शासनाचे उपसचिव संजय बनकर यांनी शासन आदेश काढला आहे.

मसुरे – डांगमोडे या ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात १५ महसूली गाव आहेत. यातील मर्डे, मसुरे, कावा, डांगमोडे, सय्यदजुवा, मार्गाचीतड, वाडीडांगमोडे, मागवणे, खाजनवाडी, चांदेर ही दहा महासूली गावे नव्याने निर्माण झालेल्या मर्डे या ग्राम पंचायतीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. बिळवस, आंगणेवाडी व भोगलेवाडी ही तीन महासूली गावे बिळवस ग्राम पंचायतमध्ये तर देऊळवाडा व खेरवंद हे गाव देऊळवाडा ग्राम पंचायतीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. २ नोव्हेंबर २०१८ पासून या तीन नव्या ग्राम पंचायती अस्तित्वात आल्या आहेत.