कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; तीन पोलीस शिपाई निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गंगाखेड पोलीस ठाण्यात नियुक्ती असलेल्या आणि पोलीस मुख्यालयाशी संलग्न असलेल्या तीन पोलिस शिपायांना सेवेतुन निलंबीत करण्यात आले आहे. सय्यद उमर, मुख्तार खाँ पठाण, राजेश मस्के असे निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस शिपायांची नावे आहेत. ते गंगाखेड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते. त्यांच्या निलंबनाबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी गुरुवारी काढले आहेत.

हे पोलीस शिपाई आर्थिक लाभासाठी अवैध व्यवसायिकांच्या संपर्कात होते. गुन्हेगारांकडून वेळोवेळी ठरावीक रक्कम घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करत नव्हते. अवैध धंदे असणाऱ्या आरोपींना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष स्वरुपात मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.