वारजेतील एकाच इमारतीतील तीन दुकाने फोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे शहरातील वारजे जकात नाका परिसरातील रत्नदीप कॉलनीतील तीन दुकानांचे कुलूप तोडून चोरट्यांनी 22 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना काल पहाटेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गौरव पाटील (28) यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी गौरव पाटील यांचे रत्नदीप कॉलनीत लेडीज बुटिक आहे. काल चोरट्यांनी हे बुटिक उचकटून 10 हजारांची रोकड चोरून नेली. त्यानंतर चोरट्यांनी सागर सराटे यांच्या दुकानातून सात हजार, रमेश देवाशी यांच्या दुकानातून साडेचार हजार मिळून 22 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बापू रायकर तपास करीत आहेत.